या शेतकऱ्यांना मिळाला पीक विमा

या शेतकऱ्यांना मिळाला पीक विमा अश्या प्रकारे आपणही तक्रार करू शकता

आज चे उपडेट हे एक ऊर्जात्मक आहे शेतकऱ्यांना ऊर्जा देणारे आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुका गाव डोंगरकडा शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे केळी या पिकासाठी शेतकऱ्यांना २०१८ मधील पीक विमा मिळाला आहे

या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होऊनही जास्त नुकसान झाल्यामुळे पीक विमा मिळाला नव्हता तर या शेतकऱ्यांनी ग्राहक मंचाकडे एक तक्रार केली हि एक केस या ठिकाणी लढली गेली आणि यातून ग्राहक मंचाने एक निर्णय दिला आहे ज्यातून शेतकऱ्यांना ३७००० रुपये हेक्टरी पीक विमा दिला जाणार आहे

तर शेतकऱ्यांना या साठी बरेच वर्ष लोटली गेली त्याचे व्याज झालेला मानसिक त्रास यासाठी २ ते ३ हजार असे खर्च देण्याचा ग्राहक मंच हिंगोली तर्फे निकाल देण्यात आला आहे तर आपलेही नुकसान झाले असेल तर अश्या प्रकारे आपणही ग्राहक मंचाकडे तक्रार देऊ शकता जसे कि हिंगोली जिल्ह्यतील शेतकरी उदाहरण ठरत आहे

Leave a Comment

0 Shares
Tweet
Share
Share
Pin